यहेज्केल 7:19
यहेज्केल 7:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते आपले सोने व चांदी रस्त्यावर फेकून देतील, त्याचा त्याग करतील, त्यांचे सोनेचांदीही त्यांना परमेश्वराच्या क्रोधापासून वाचवू शकणार नाही, त्यांच्या जीवाचा बचाव होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.
यहेज्केल 7:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“ ‘ते आपली चांदी रस्त्यावर फेकतील, आणि त्यांचे सोने अशुद्ध मानले जाईल. याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे चांदी व सोने त्यांची सुटका करू शकणार नाही. ते त्यांची भूक मिटवणार नाही किंवा त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांच्या संपत्तीनेच त्यांना पापात पडण्यास भाग पाडले आहे.
यहेज्केल 7:19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते आपले रुपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यांना आपले सोने अमंगळ वाटेल; परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही; त्यापासून त्यांच्या जिवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.