यहेज्केल 9:3-4
यहेज्केल 9:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग इस्राएली देवाचे गौरवी तेज करुबा वरुन निघून घराच्या उंबरठ्यावर आले. त्याने तागाचे वस्त्र परीधान केलेले ज्यांच्या हाती एका बाजूला शास्रांचे उपकरण होते त्यांना बोलावले. परमेश्वर देव त्यांना म्हणाला, “यरूशलेमेच्या मध्य भागातून प्रवेश करा, जे पुरुष विव्हळ झाले, त्यांच्या माथ्यावर खुण करा, आणि शहरात केलेल्या सगळ्या अपवित्र गोष्टींसाठी उसासे टाका.”
यहेज्केल 9:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता करुबांवर असलेले इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव तिथून वर जाऊन, मंदिराच्या उंबरठ्यावर आले. तेव्हा ज्या पुरुषाने तागाची वस्त्रे घातली होती व ज्याच्याकडे लेखन सामुग्री होती, त्याला याहवेहने बोलाविले आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.”
यहेज्केल 9:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
करूबारूढ असलेल्या इस्राएलाच्या देवाचे तेज तेथून निघून मंदिराच्या उंबरठ्यावर आले; आणि कंबरेनजीक कारकुनाची दऊत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्यास त्याने हाक मारली. परमेश्वर त्याला म्हणाला, “नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.”