एज्रा 2:68-69
एज्रा 2:68-69 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा ते यरुशलेमात याहवेहच्या मंदिरात आले, काही कुलप्रमुखांनी परमेश्वराच्या भवनाची पुनर्बांधणी करण्यास त्या जागीच स्वेच्छेने दाने दिली. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार जितके देणे शक्य होते तितके दिले. या कामासाठी 61,000 दारिक सोने, 5,000 मीना चांदी व 100 याजकीय झगे भांडारात आणले.
एज्रा 2:68-69 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पितृकुळातील कित्येक प्रमुख पुरुष यरुशलेमेतील परमेश्वराच्या मंदिराकडे आले तेव्हा देवाचे मंदिर पूर्ववत उभे करण्यासाठी त्यांनी स्वखुशीने अर्पणे दिली; त्यांनी आपल्या शक्तीनुसार एकसष्ट हजार दारिक1 सोने पाच हजार माने1 चांदी आणि शंभर याजकीय वस्त्रे भांडारात पावती केली.
एज्रा 2:68-69 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे सर्वजण यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या. या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ती अशी: सोने एकसष्ट हजार दारिक, चांदी पाच हजार माने, आणि याजकांचे झगे शंभर.