एज्रा 3:11
एज्रा 3:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“तो चांगला आहे! इस्राएलावर त्याची दया सर्वकाळ आहे.” स्तुती आणि उपकार मानत अशी गीते त्यांनी गाईली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या.
सामायिक करा
एज्रा 3 वाचाएज्रा 3:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली: “याहवेह चांगले आहेत. इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत.” याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली.
सामायिक करा
एज्रा 3 वाचाएज्रा 3:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“परमेश्वर चांगला आहे व इस्राएलावर त्याची दया सनातन आहे” असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जयजयकार केला.
सामायिक करा
एज्रा 3 वाचा