एज्रा 8:22-23
एज्रा 8:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाकडे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. कारण आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.” म्हणून आम्ही उपवास आणि देवाची प्रार्थना केली. देवाने आमचा धावा ऐकला.
एज्रा 8:22-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण प्रवासात शत्रूपासून संरक्षण मिळावे म्हणून राजाजवळ सैनिक व स्वार मागण्याची मला लाज वाटली. आम्ही राजाला आधीच सांगितले होते, “जे आमच्या परमेश्वराची भक्ती करतात, त्यांचा वरदहस्त त्यांच्यावर असतो आणि जे त्यांना सोडतात, त्यांच्यावरच अरिष्ट येते.” म्हणून आम्ही उपास केला आणि आमची काळजी घेण्याबद्दल परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्यांनी आमचे रक्षण केले.
एज्रा 8:22-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव होण्यासाठी राजाकडे शिपाई व घोडेस्वार ह्यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली; कारण आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की, “आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व त्याचा क्रोध ही प्रकट होतात.” ह्यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली ती त्याने ऐकली.