उत्पत्ती 18:23-24
उत्पत्ती 18:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय? कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय?
सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचाउत्पत्ती 18:23-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय? जर त्या शहरात पन्नास नीतिमान लोक आढळले तरी त्यांचा तुम्ही नाश करणार आणि त्यात असलेल्या नीतिमान लोकांसाठी तुम्ही त्यांची गय करणार नाही काय?
सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचाउत्पत्ती 18:23-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय?
सामायिक करा
उत्पत्ती 18 वाचा