उत्पत्ती 26:4-5
उत्पत्ती 26:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुझे वंशज आकाशातील ताऱ्यांइतके बहुगुणित करीन आणि हे सर्व देश मी तुझ्या वंशजांना देईन. तुझ्या वंशजांद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. मी हे करीन कारण अब्राहामाने माझा शब्द पाळला आणि माझे विधी, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.”
उत्पत्ती 26:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुझ्या वंशजांची संख्या असंख्य तार्यांसारखी करेन. मी हा सर्व प्रदेश तुझ्या वंशजांना देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले.”
उत्पत्ती 26:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आकाशातील तार्यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील; कारण अब्राहामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.”