उत्पत्ती 27:28-29
उत्पत्ती 27:28-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव तुला आकाशातले दव व भूमीची समृद्धी व भरपूर धान्य व द्राक्षरस देईल. लोक तुझी सेवा करोत व राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील. तुझ्या आईची मुले तुला नमन करतील. तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल आणि तुला आशीर्वाद देणारा प्रत्येकजण आशीर्वादित होईल.”
उत्पत्ती 27:28-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर तुला आकाशातील दव आणि पृथ्वीची समृद्धी देतील, भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील. राष्ट्रे तुझी सेवा करोत, आणि लोक तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो. तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत. जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत, आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत.”
उत्पत्ती 27:28-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देव तुला आकाशाचे दहिवर पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षारस देवो; लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.