उत्पत्ती 27:36
उत्पत्ती 27:36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एसाव म्हणाला, “त्याचे याकोब हे नाव त्यास योग्यच आहे की नाही? त्याने माझी दोनदा फसवणूक केली आहे. त्याने माझा ज्येष्ठपणाचा हक्क हिरावून घेतला आणि आता त्याने माझा आशीर्वादही काढून घेतला आहे.” आणि एसाव म्हणाला, “माझ्याकरिता तुम्ही काही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”
उत्पत्ती 27:36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यावर एसावाने म्हटले, “त्याचे नाव याकोब योग्यच नाही काय? त्याने दुसर्यांदा मला फसविले आहे. त्याने माझा जन्मसिध्द हक्क घेतला आणि आता माझा आशीर्वादही चोरला आहे.” नंतर त्याने विचारले, “माझ्यासाठी तुम्ही एकही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”
उत्पत्ती 27:36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा एसाव म्हणाला, “त्याला याकोब (युक्तीने हिरावून घेणारा) हे नाव यथार्थच ठेवले नाही काय? कारण त्याने दोनदा मला दगा दिला; त्याने माझा ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला तो घेतलाच व आता माझ्या आशीर्वादाचाही त्याने अपहार केला; तर आपण माझ्यासाठी काहीच आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”