उत्पत्ती 27:39-40
उत्पत्ती 27:39-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्याचा बाप इसहाकाने उत्तर दिले आणि त्यास म्हणाला, “पाहा, जेथे पृथ्वीवरील समृद्धी व आकाशातले दंव पडते त्या ठिकाणापासून दूर तुझी वस्ती होईल. तुझ्या तलवारीने तू जगशील व आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा तू बंड करशील, तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील.”
उत्पत्ती 27:39-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचे वडील इसहाक त्याला उत्तर देत म्हणाले, “तुझे वास्तव्य सुपीक प्रदेशापासून दूर आकाशातील दहिवर पडते तिथून दूर असेल. तलवारीच्या जोरावर तू जगशील तू आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा अस्वस्थ होशील, तेव्हा तुझ्यावर असलेले त्याचे जू तू तुझ्यावरून झुगारून देशील.”
उत्पत्ती 27:39-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “पाहा, पृथ्वीवरील सुपीक जमिनीपासून दूर वरून आकाशातील दव पडते तेथून दूर तुझी वस्ती होईल; तू आपल्या तलवारीने जगशील, व आपल्या भावाचे दास्य करशील. तरी असे घडून येईल की तू अनावर होशील, तेव्हा तू आपल्या मानेवरचे त्याचे जू उडवून देशील.”