YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 6:1-4

उत्पत्ती 6:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या, तेव्हा मानवजातीच्या मुली आकर्षक आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, त्यांच्यापैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी स्त्रिया करून घेतल्या. परमेश्वर म्हणाला, “माझा आत्मा मानवामध्ये सर्वकाळ राहणार नाही, कारण ते देह आहेत. ते एकशें वीस वर्षे जगतील.” त्या दिवसात आणि त्यानंतरही, महाकाय मानव पृथ्वीवर होते. देवाचे पुत्र मनुष्यांच्या मुलीपाशी गेले, आणि त्यांच्याकडून त्यांना मुले झाली, तेव्हा हे घडले. प्राचीन काळचे जे बलवान, नामांकित पुरूष ते हेच.

सामायिक करा
उत्पत्ती 6 वाचा

उत्पत्ती 6:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांना कन्या झाल्या; तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशे वीस वर्षांचा काळ देईन.” त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.

सामायिक करा
उत्पत्ती 6 वाचा