हाग्गय 1:5-6
हाग्गय 1:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता सेनाधीश परमेश्वर म्हणतोः तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष द्या! तुम्ही खूप बीज पेरता, पण तुमच्या हाती थोडेच पीक लागते; तुम्ही खाता पण ते तुम्हास पुरेसे नसते, तुम्ही पिता पण पिण्याने तुमची तृप्ती होत नाही, तुम्ही कपडे घालता परंतु त्यांनी ऊब येत नाही, आणि जो मजुरी मिळवतो तो ती छिद्र पडलेल्या पिशवीत घालण्यासाठी कमवतो.”
हाग्गय 1:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्वसमर्थ याहवेह म्हणतात ते असे: “तुम्ही तुमच्या आचरणाकडे नीट लक्ष द्या. तुम्ही पुष्कळ पेरणी केली, पण कापणी मात्र फारच थोडीच केली. तुम्ही जेवता, पण ते कधीही पुरेसे नसते. तुम्ही पीता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही वस्त्र घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. तुम्ही वेतन मिळविता, पण तुम्ही ते पुष्कळ भोके असलेल्या खिशांमध्ये ठेवता.”
हाग्गय 1:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो.