इब्री 10:24-25
इब्री 10:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा.
इब्री 10:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ. आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि देवाचा दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन द्यावे.
इब्री 10:24-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या. आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे.
इब्री 10:24-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपण प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन मिळेल असे एकमेकांकडे लक्ष देऊ या. आपल्यापैकी अनेक लोक करीत आहेत त्याप्रमाणे आपण एकत्र येत राहून प्रभूचा दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते, तसतसा एकमेकांना अधिक बोध करावा