इब्री 11:5
इब्री 11:5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हनोखला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासामुळे लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही; कारण त्याला देवाने लोकांतरी नेले; लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला प्रसन्न करीत असे
इब्री 11:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हनोखाला मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून, त्यास विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले; आणि तो कोठे सापडला नाही, कारण देवाने त्यास नेले. त्यास लोकांतरी नेण्यापूर्वी त्याच्याविषयी अशी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.
इब्री 11:5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
विश्वासाद्वारे हनोख जिवंत असताना परमेश्वराने त्याला स्वर्गात नेले, त्याला मृत्यूचा अनुभव आला नाही: “तो एकाएकी दिसेनासा झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.” हे घडण्यापूर्वी परमेश्वर म्हणाला होता की तो हनोखाच्या बाबतीत अतिशय संतुष्ट होता.
इब्री 11:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि ‘तो सापडला’ नाही; ‘कारण त्याला देवाने लोकांतरी नेले;’ लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, ‘तो देवाला संतोषवीत असे;’