होशेय 11:7-9 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
होशेय 11:7-9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत. हे एफ्राइमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्राएला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोइमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. मी आपल्या क्रोधसंतापाप्रमाणे करणार नाही, मी एफ्राइमाचा नाश करण्याकरता मागे फिरणार नाही; कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे; तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे; मी क्रोधावेशाने येणार नाही.
होशेय 11:7-9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही. हे एफ्राईमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोयिमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे. मी माझा भयानक राग अमलात आणणार नाही मी एफ्राईमाचा पुन्हा नाश करणार नाही कारण मी देव आहे आणि मनुष्य नाही तुमच्यामध्ये असणारा मी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही.
होशेय 11:7-9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या लोकांनी माझा त्याग करून दूर जाण्याचा निश्चय केला आहे. त्यांनी मला परमोच्च परमेश्वर म्हटले तरी मी त्यांना कोणत्याही प्रकारे उन्नत करणार नाही. “अरे एफ्राईमा, मी तुला कसे सोडू शकतो? अरे इस्राएला, मी तुला दुसऱ्याच्या हाती कसे सोपवून देऊ? मी तुला अदमाहसारखे कसे वागवू शकतो? मी तुला सबोईमसारखा कसे बनवू शकतो? माझे हृदय आतल्याआत आक्रोश करीत आहे; माझी सर्व करुणा जागृत झाली आहे. मी माझ्या तीव्र रागाप्रमाणे वागणार नाही, मी एफ्राईमचा पुन्हा नाश करणार नाही. कारण मी तुमच्यामध्ये एक पवित्र परमेश्वर आहे. मनुष्य नाही. मी त्यांच्या शहरांविरुद्ध येणार नाही.