यशया 40:12-14
यशया 40:12-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले आहे, आकाशाचे माप आपल्या वतीने, पृथ्वीवरची धूळ पाटीत धरली, डोंगराचे वजन तागडीत किंवा टेकड्या तराजूत तोलल्या आहेत? परमेश्वराचे मन कोणाला समजले आहे किंवा त्याचा सल्लागार म्हणून कोणी सूचना दिल्या आहेत? त्याने कोणापासून कधी सूचना स्विकारली? कोणी त्यास योग्य गोष्टी करण्याचा मार्ग शिकवला, आणि त्यास कोणी ज्ञान शिकवले किंवा सुज्ञतेचा मार्ग दाखवला?
यशया 40:12-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जलांचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे? आकाशाचे माप आपल्या वितीने कोणी घेतले आहे? पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे? डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत? परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे? त्याने कोणाला मसलत विचारली? सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले? त्याला कोणी ज्ञान शिकवले? सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखवला?