यशया 46:10-11
यशया 46:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत, त्या मी आधीपासून सांगत आलो आहे. मी म्हणतो, “माझ्या योजना सिद्धीस जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन.” मी पूर्वेककडून एका हिंस्त्र पक्षाला, माझ्या निवडीचा मनुष्य दूरच्या देशातून बोलावतो; होय, मी बोललो आहे; ते मी पूर्णही करीन; माझा उद्देश आहे, मी तोसुध्दा पूर्ण करीन.
यशया 46:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी सुरुवातीपासूनच शेवट कळवितो व पुरातन काळातच भावी काळात होणाऱ्या गोष्टी प्रगट करतो. मी म्हणतो, ‘माझ्या योजना कायम राहतील, आणि माझ्या इच्छेस येईल ते मी करेन.’ मी पूर्वेकडून त्या वेगवान हिंस्र पक्ष्याला, त्या अति दूर असलेल्या मनुष्याला माझा हेतू साध्य करण्यासाठी बोलवेन. जे मी बोललो, ते मी घडवून आणणार; जे मी योजले आहे, ते मी करेनच!
यशया 46:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’ उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.