यशया 52:14-15
यशया 52:14-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांस धक्का बसला. त्याचे रुप कोणाही मनुष्यापेक्षा बिघडलेले होते, म्हणून त्याचे रुप दुसऱ्या मनुष्यांपेक्षा फार वेगळे होते. तो पुष्कळ राष्ट्रांस शिंपडील, त्याच्याकडे पाहून राजे आपली तोंडे बंद करतील, कारण जे त्यांना सांगितले नव्हते ते पाहतील, आणि जे त्यांनी ऐकले नव्हते ते समजतील.”
यशया 52:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप होता), त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील;2 राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.
यशया 52:14-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जसे त्याला पाहताच अनेकजण विस्मित झाले होते— त्याचे स्वरूप मनुष्यप्राण्याच्या पलीकडे विद्रुप करण्यात आले होते आणि त्याचा आकार मानवसदृश्य राहिला नव्हता— यास्तव तो अनेक राष्ट्रांवर शिंपडेल, आणि त्याच्यामुळे राजे आपले मुख बंद करतील. कारण त्यांना पूर्वी कधी कोणी जे सांगितले नव्हते, ते आता बघतील, आणि ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.