यशया 55:10-11
यशया 55:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही. तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही, परंतु जे मी इच्छिले ते पूर्ण करील आणि ज्यासाठी पाठवले ते यशस्वी होईल.
यशया 55:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आकाशातून पाऊस व हिम ज्याप्रमाणे खाली पडतात आणि पृथ्वीला भिजवून टाकल्याशिवाय परत जात नाहीत आणि तिला अंकुरतात व बहरतात, जेणेकरून पेरणार्यासाठी बीज निपजते व खाणार्याला भाकर मिळते, त्याप्रमाणे माझे वचन, जे माझ्या मुखातून बाहेर पडते: ते कार्य केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही, पण ते माझ्या इच्छेप्रमाणे सर्व परिपूर्ण करते व ज्या कार्यासाठी पाठविण्यात आले, तो माझा हेतू साध्य करते.
यशया 55:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणार्यास बीज, खाणार्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.