यशया 56:6-7
यशया 56:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्याच्या आराधनेसाठी स्वतःहून त्याच्याशी जोडले आहेत, जे प्रत्येकजण शब्बाथ पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन; त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील, कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील.
यशया 56:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात, जे त्यांची सेवा करतात, त्यांच्या नावावर प्रीती करतात, आणि त्यांचे सेवक झाले आहेत, जे सर्व त्यांच्या शब्बाथास अपवित्र न करता त्याचे पालन करतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात— अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”
यशया 56:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात, त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांना हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.