यशया 57:15-16
यशया 57:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो. कारण मी सतत वाद करणारा नव्हे, सदा कोप करणारा नव्हे; असतो तर माझ्यापुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवप्राणी गलित झाले असते.
यशया 57:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो, नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला, अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो. कराण मी सदासर्वकाळ दोष लावणार नाही आणि सदासर्वकाळ रागही धरणार नाही. कारण मनुष्याचा आत्मा आणि मी त्यास दिलेले जीवन, हे माझ्यासमोर कमजोर होतील.
यशया 57:15-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे अनंतकाळ अस्तित्वात आहेत, ज्यांचे नाम पवित्र आहे जे सर्वोच्च व परमथोर आहेत, ते म्हणतात— “मी परमोच्च व पवित्रस्थानी राहतो, परंतु जे पश्चात्तापी व आत्म्याने लीन आहेत, अशांसोबतही राहतो, मी नम्र जणांच्या आत्म्यांना ताजेतवाने करतो व पश्चात्तापी अंतःकरणाच्या लोकांना नवा धीर देतो. मी त्यांना कायमचे दोषी ठरविणार नाही, नेहमीच क्रोध प्रकट करणार नाही, नाहीतर मी प्रत्यक्ष माझ्या हातांनी घडवले लोक माझ्यामुळे मूर्छित होतील.