यशया 62:6-7
यशया 62:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे यरूशलेमे, तुझ्या वेशीवर मी रखवालदार ठेवला आहे. ते रांत्रदिवस गप्प बसणार नाहीत. जे तुम्ही परमेश्वरास स्मरता, ते तुम्ही शांत बसू नका. यरूशलेमेला पुन:स्थापीपर्यंत आणि पृथ्वीवर तिला प्रशंसनीय करीपर्यंत, त्यास विसावा घेऊ देऊ नका.
सामायिक करा
यशया 62 वाचायशया 62:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. तू जी याहवेहचा धावा करते, स्वतःला विसावा देऊ नको, आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत, परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको.
सामायिक करा
यशया 62 वाचायशया 62:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका; आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका.
सामायिक करा
यशया 62 वाचा