यशया 9:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
यशया 9:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
सामायिक करा
यशया 9 MARVBSIयशया 9:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही, दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील, सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
सामायिक करा
यशया 9 IRVMARयशया 9:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा अंत होणार नाही. ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील, ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत न्याय आणि धार्मिकता स्थापन करतील आणि टिकवतील. सर्वसमर्थ याहवेहचा आवेश हे पूर्ण करेल.
सामायिक करा
यशया 9 MRCV