शास्ते 12:5-6
शास्ते 12:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा गिलाद्यांनी एफ्राइम्यांसमोर यार्देनेचे उतार रोखून धरले, आणि असे झाले की, जेव्हा कोणी एफ्राइमी पळताना बोलला, “तुम्ही मला पार जाऊ द्या,” असे म्हणे. तेव्हा गिलादी माणसे त्यास म्हणत असत, “तू एफ्राथी आहेस की काय?” आणि तो जर “नाही” असे बोलला, तर ते त्यास म्हणत, “आता तू शिब्बोलेथ असे म्हण,” तेव्हा तो “सिब्बोलेथ” असे म्हणत असे (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता). मग ते त्यास धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळी एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली.
शास्ते 12:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
गिलआदांनी एफ्राईमकडे जाणारे यार्देनेचे खोरे काबीज केले आणि जेव्हा एफ्राईममधील कोणी वाचला व म्हणाला, “मला ओलांडू दे,” तेव्हा गिलआदाचे लोक त्याला विचारीत, “तू एफ्राईमी आहेस का?” जर तो म्हणाला, “नाही,” ते म्हणत, “ठीक आहे मग ‘शिब्बोलेथ म्हण.’ ” जर तो “सीब्बोलेथ,” म्हणाला, कारण तो ते शब्द नीट उच्चारू शकला नाही, तर ते त्याला धरत आणि त्याला यार्देनेच्या उतारावर ठार करीत. त्यावेळी एफ्राईमचे बेचाळीस हजार लोक ठार झाले.
शास्ते 12:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
गिलाद्यांनी एफ्राइमी लोकांना अडवण्यासाठी यार्देनेचे उतार रोखून धरले. आणि कोणी एफ्राइमी पळपुट्या त्यांना म्हणे, “मला पलीकडे जाऊ द्या,” तेव्हा गिलादी लोक त्याला विचारत, “तू एफ्राइमी आहेस काय?” त्याने “नाही” असे म्हटले तर ते त्याला म्हणत, “शिब्बोलेथ म्हण”; तेव्हा तो “सिब्बोलेथ” म्हणे. त्या शब्दाचा उच्चार त्याला करता येत नसे म्हणून ते त्याला धरून यार्देनेच्या उताराजवळ मारून टाकत. त्या प्रसंगी एफ्राइमातले बेचाळीस हजार प्राणास मुकले.