शास्ते 16:17
शास्ते 16:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून शमशोनाने तिला सर्वकाही सांगितले, आणि म्हणाला, “माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीच वस्तरा फिरविला गेला नाही; कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे; जर माझे मुंडन झाले, तर माझे बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन इतर मनुष्यांसारखा होईन.”
शास्ते 16:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून त्याने तिला सर्वकाही सांगितले, “माझ्या डोक्यावर कधीही वस्तरा वापरला नाही,” तो म्हणाला, “कारण मी माझ्या आईच्या उदरात होतो तेव्हापासून मी परमेश्वराला समर्पित एक नाजीर आहे. जर माझे केस कापले गेले, तर माझी शक्ती मला सोडून जाईल आणि मी दुसर्या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन बनेन.”
शास्ते 16:17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून त्याने आपले मनोगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, “माझ्या डोक्याला कधी वस्तरा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवासाठी नाजीर आहे; माझे मुंडण केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.”