शास्ते 16:30
शास्ते 16:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा शमशोन म्हणाला, “पलिष्ट्यांच्या बरोबर माझाही जीव जावो!” मग त्याने सर्व बळ एकवटून ते खांब ढकलले, आणि ते सभागृह त्या अधिकाऱ्यांवर व त्यातल्या सर्व लोकांवर पडले. अशा रीतीने तो जिवंत असताना त्याने जितके मारले होते, त्यांपेक्षाही त्याच्या मरणाच्या वेळी त्याने जे मारले ते अधिक होते.
शास्ते 16:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शमशोन म्हणाला, “या पलिष्ट्यांबरोबर मलाही मृत्यू येवो!” नंतर त्याने आपल्या पूर्ण सामर्थ्याने ढकलले, आणि ते मंदिर अधिकारी आणि सर्व लोक यांच्यावर कोसळले. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याने जेवढे लोक ठार केले त्यांची संख्या, त्याने आपल्या सर्व हयातीत मारलेल्या संख्येहून अधिक होती.
शास्ते 16:30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“पलिष्ट्यांबरोबर मलाही मरण येवो,” असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या सार्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते.