यिर्मया 22:15-16
यिर्मया 22:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझ्या घरात खूप गंधसरु आहे म्हणून चांगला राजा आहेस काय? तुझे वडील खात, पीत नव्हते काय? तरी ते न्याय आणि नितीमानता करत असत. तेव्हा त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले. तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे, मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो.
यिर्मया 22:15-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तू गंधसरूचा जास्तीत जास्त वापर केला तर ते तुला राजा बनविल काय? तुझा पिता खातपीत नव्हता काय? त्याने जे योग्य आणि न्याय्य केले, म्हणून त्याचे सर्व चांगलेच झाले. त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले, म्हणून त्याचे सर्व भले झाले. मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?” असे याहवेह म्हणतात.
यिर्मया 22:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू गंधसरूची शेखी मिरवतोस म्हणून तू राजा ठरशील काय? तुझा बाप खातपीत व न्यायाने व नीतीने वागत नसे काय? तेव्हा त्याचे बरे चालले होते. दीनदुबळ्यांचा तो न्यायनिवाडा करी तेव्हा त्याचे बरे चालले होते. परमेश्वर म्हणतो, हेच मला जाणणे नव्हे काय?