यिर्मया 28:15-16
यिर्मया 28:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टा म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू या लोकांस लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले. म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, मी तुला या जगातून उचलीन, या वर्षी तू मरशील, कारण तू परमेश्वराविरूद्ध अप्रामाणिकतेचे निवेदन केलेस.”
यिर्मया 28:15-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग यिर्मयाह संदेष्टा हनन्याहला म्हणाला, “हनन्याह, ऐक! याहवेहने तुला पाठविलेले नाही, परंतु तू तुझ्या खोट्या संदेशावर विश्वास ठेवण्यास या राष्ट्रास विवश केले. म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ”
यिर्मया 28:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला : “हनन्या, आता हे ऐक; परमेश्वराने तुला पाठवले नाही; तू ह्या लोकांना लबाडीवर भरवसा ठेवायला लावलेस. ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो, ‘मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन; तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून ह्या वर्षी तू खरोखर मरशील.”’