यिर्मया 4:1-2
यिर्मया 4:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर असे म्हणतो, “हे इस्राएल जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील. तू आपले तिरस्करणीय गोष्टी माझ्यासमोर दूर करशील आणि जर तू भटकणार नाहीस, आणि जर तू परमेश्वर जिवंत आहे अशी शपथ, सत्यतेने, न्यायाने आणि न्यायीपणाने वाहशील, तर त्याच्या ठायी राष्ट्रे आपणास आशीर्वादीत म्हणतील व त्याच्या ठायी हर्ष करतील.”
यिर्मया 4:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह म्हणतात, “हे इस्राएला, जर तू परत फिरशील,” “मग माझ्याकडे परत ये.” “जर तू आपल्या अमंगळ मूर्ती पूर्णपणे माझ्या दृष्टीसमोरून दूर करशील आणि तू कधीही पथभ्रष्ट होणार नाही, आणि जर सत्यतेने, न्यायीपणाने आणि नीतिमार्गाने चालशील, ‘जिवंत याहवेहची शपथ वाहशील,’ तर मग राष्ट्रे याहवेहच्या द्वारे आशीर्वादित होतील. आणि याहवेहच्या नामामध्ये त्यांचा गौरव करतील.”
यिर्मया 4:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“परमेश्वर म्हणतो, हे इस्राएले, जर तू माझ्याकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्यासमोरून दूर करशील, बहकणार नाहीस, आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”