यिर्मया 9:23-24
यिर्मया 9:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.” पण जर कोणाला अभिमान बाळगायचा असेल या गोष्टीत बाळगावा, की तो मला समजतो आणि मला ओळखोतो, कारण मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणा व न्याय आणि नितीमानता या पृथ्वीवर चालवतो, कारण या गोष्टींमध्ये मला हर्ष वाटतो, परमेश्वर असे म्हणतो.
यिर्मया 9:23-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहने असे म्हणतात: “शहाण्याने स्वतःच्या शहाणपणाचा अभिमान बाळगू नये. बलाढ्य मनुष्याने बलाचा तोरा मिरवू नये आणि श्रीमंताने श्रीमंतीचा गर्व करू नये. जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी मी याहवेह, जो कृपा करणारा पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे, असे त्यांनी मला खरोखर समजावे, ह्यात मला संतोष आहे, असे याहवेहने म्हणतात.”
यिर्मया 9:23-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर म्हणतो, “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये; बाळगायचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्याविषयी बाळगावा; ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो.”