योहान 19:26-27
योहान 19:26-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्याच्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!” नंतर त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्यानंतर त्या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.
योहान 19:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने जेव्हा आपल्या आईला व तो ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्यास जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, “आई, पाहा, हा तुझा मुलगा.” मग तो त्या शिष्याला म्हणाला, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्याकडे घेतले.
योहान 19:26-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग येशूंनी आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्यांची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा पुत्र!” आणि त्यांनी त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
योहान 19:26-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!” मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.