योहान 2:15-16
योहान 2:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने दोर्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणार्यांना म्हणाला, “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
योहान 2:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा त्याने दोर्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले. व त्याने कबुतरे विकणार्यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
योहान 2:15-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा त्यांनी दोर्यांचा एक चाबूक तयार केला आणि त्या सर्वांना मेंढरे आणि गुरे यांच्यासहित मंदिराच्या परिसरातून बाहेर घालविले आणि नाणी बदलून देणार्यांचे मेज पालथे करून त्यांची नाणी उधळून टाकली. मग जे कबुतरे विकणारे होते त्यांना ते म्हणाले, “यांना येथून काढा! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका”
योहान 2:15-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने दोरांचा एक आसूड वळून बैल व मेंढरे ह्यांच्यासह सर्वांना मंदिरातून हाकलून लावले. सराफांचा खुर्दा फेकून दिला व चौरंग पालथे केले. तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “ही येथून काढा. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”