योहान 6:11-12
योहान 6:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये.”
योहान 6:11-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या माशांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.”
योहान 6:11-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग येशूंनी भाकरी घेतल्या, आभार मानून, जे बसले होते त्यांना तृप्त होईपर्यंत हव्या तेवढ्या वाटल्या. त्यानंतर मासळ्यांचेही त्यांनी तसेच केले. सर्वांनी भरपूर जेवण केल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “आता उरलेले तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”
योहान 6:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशूने त्या भाकरी घेतल्या; आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्यांना वाटून दिल्या; तसेच त्या मासळ्यांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.”