ईयोब 24:22-24
ईयोब 24:22-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरी देव आपल्या सामर्थ्याने बलवानास राखतो, ज्याला जगण्याचा भरवसा नाही तो उठतो, देव दुष्टांना आपण सुरक्षित आहेत असा विचार करण्यास भाग पाडतो आणि त्याविषयी ते आनंदी होतात. ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात. खरोखर, ते खचून जातात, ते इतर सर्वांप्रमाणे काढून टाकले जातात. आणि ते कणसाच्या शेड्यांप्रमाणे कापून टाकले जातात.
ईयोब 24:22-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु परमेश्वर बलवानाला आपल्या सामर्थ्याने राखतात; त्याला जीवनाची खात्री नसली तरी ते स्थिरावतात. आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले, तरी परमेश्वराची नजर त्यांच्या मार्गावर असते. त्यांची बढती केवळ क्षणभंगुर आहे आणि ते लवकरच नष्ट होतात; इतरांप्रमाणे ते देखील गळून पडतात; धान्याच्या कणसाप्रमाणे ते कापले जातील.
ईयोब 24:22-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरी बलिष्ठांनाही देव आपल्या सामर्थ्याने राखतो; त्यांनी वाचण्याची आशाही सोडून दिली असली तरी ते निभावतात. तो त्यांना निर्भय राखतो म्हणून ते स्वस्थ असतात; त्यांच्या व्यवहारावर त्याची कृपादृष्टी असते. ते उन्नती पावतात; तरी अल्पकाळातच ते नाहीतसे होतात; ते अवनत होऊन सर्वांप्रमाणे त्यांची गती होते, कणसाच्या शेंड्यासारखे ते छाटले जातात.