ईयोब 33:15-18
ईयोब 33:15-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टान्तात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछान्यावर पडून झोप घेत असता, देव त्याचे कान उघडतो; त्याला प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो. तेणेकरून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालतो, पुरुषाच्या गर्वाचा परिहार करतो; तो त्याचा जीव गर्तेपासून राखतो. शस्त्राने होणार्या नाशापासून त्याचा जीव वाचवतो.
ईयोब 33:15-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो. नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो, आणि त्याच्या धमकीने घाबरवितो. मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, आणि गर्व न करण्याचेही सांगतो. देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो.
ईयोब 33:15-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
रात्रीच्या स्वप्नात, दृष्टान्तामध्ये, जेव्हा लोकांना गाढ झोप लागलेली असते त्यांच्या बिछान्यावर डुलक्या घेत असताना, परमेश्वर त्यांच्या कानात बोलून आणि चेतावणी देऊन त्यांना घाबरवितात, म्हणजे ते मनुष्याच्या चुकीच्या वर्तनापासून फिरतील आणि अहंकारापासून दूर राहतील, खड्ड्यात पडण्यापासून आणि तलवारीने त्यांचे जीवन नष्ट होण्यापासून त्यांना राखतील.