ईयोब 4:4-6
ईयोब 4:4-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझ्या शब्दांनी ठेचाळत असलेल्यास धीर दिला आहेस, लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत; पण तुझ्यावर प्रसंग आला असता तू कष्टी होतोस; तुला दुःखस्पर्श झाला म्हणजे तू घाबरतोस, तुझ्या देवभक्तीचा तुला आश्रय आहे ना? तुझ्या सात्त्विक आचरणावर तुझी आशा आहे ना?
ईयोब 4:4-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू तुझ्या शब्दांनी खाली पडणाऱ्यांना सावरले आहेस. तू अशक्त गुडघे बळकट केले आहेस. पण आता संकटे तुझ्यावर आली आहेत, आणि तू खचला आहेस, ते तुला स्पर्श करतात. आणि तू त्रासात पडतोस. तुझ्या देवभिरूपणाची तुला खात्री नाही काय, तुझी सात्वीकत्ता तुझ्या आशेचे मार्ग नाही काय?
ईयोब 4:4-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुझ्या शब्दांनी अडखळलेल्यांना आधार दिला आहे; आणि लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेस. परंतु आता तुझ्यावर संकट आले आणि तू निराश झालास; तुझ्यावर आघात झाला आणि तू भयभीत झालास. तुझी भक्ती हा तुझा आत्मविश्वास नसावा काय आणि तुझे निर्दोष मार्ग तुझी आशा असू नयेत काय?