यहोशवा 4:21-23
यहोशवा 4:21-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो इस्राएल लोकांस म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल लोक ह्या यार्देनेच्या कोरड्या भूमीतून पार गेले. आम्ही तांबडा समुद्र पार करेपर्यंत, तुमचा देव परमेश्वर याने जसे तांबड्या समुद्राचे पाणी आटवून कोरडे केले, तसेच परमेश्वर तुमचा देव ह्याने यार्देनेचे पाणी आम्ही तिच्यातून चालत पार आलो तोपर्यंत आमच्यापुढून हटवले.
यहोशवा 4:21-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो इस्राएली लोकांना म्हणाला, “भविष्यकाळात तुमचे वंशज त्यांच्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ त्यांना सांग, ‘इस्राएली लोक यार्देन नदीतून कोरड्या जमिनीवरून पलीकडे आले.’ कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्ही यार्देन नदी पार करेपर्यंत तुमच्यासमोर नदीचे पात्र कोरडे ठेवले. याहवेह तुमच्या परमेश्वरांनी यार्देन नदीचे जसे केले तसेच त्यांनी आम्ही लाल समुद्र पार करेपर्यंत तो कोरडा केला होता.
यहोशवा 4:21-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो इस्राएल लोकांना म्हणाला की, “पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपापल्या वडिलांना विचारतील, ‘ह्या धोंड्यांचे महत्त्व काय?’ तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, ‘इस्राएल ह्या यार्देनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार आले.’ आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तो आटवून कोरडा केला होता, त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली.