लूक 11:2-4
लूक 11:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो, आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे, आमच्या पापांची आम्हास क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव.”
लूक 11:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी शिष्यांना सांगितले, “अशा रीतीने प्रार्थना करा: “ ‘हे पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो; तुमचे राज्य येवो. आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या. कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो; तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा आम्हास परीक्षेत आणू नका.’ ”
लूक 11:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा : “हे [आमच्या स्वर्गातील] पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. [जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.] आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे; आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, [तर आम्हांला वाइटापासून सोडव.]”
लूक 11:2-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो. आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.”