लूक 17:1-2
लूक 17:1-2 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना पापाला प्रवृत्त करण्याऱ्या गोष्टी घडणार, पण ज्याच्यामुळे त्या घडतात त्याला केवढे क्लेश होणार! त्याने ह्या लहानांतील एकाला पापासाठी प्रवृत्त करावे, ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकावे, ह्यात त्याचे हित आहे.
लूक 17:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे यामध्ये त्याचे हित आहे.
लूक 17:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “लोकांना अडखळण होतील अशा गोष्टी निश्चितच येतीलच, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याचा धिक्कार असो. जो कोणी या लहानातील एकालाही अडखळण करतो, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून द्यावे हे त्याच्या अधिक हिताचे ठरेल.
लूक 17:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने शिष्यांना म्हटले, “अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे; परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! त्याने ह्या लहानांतील एकाला अडखळण करावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात त्याचे हित आहे.