लूक 20:46-47
लूक 20:46-47 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते, त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते. ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या मनुष्यांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”
लूक 20:46-47 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“या नियमशास्त्राच्या शिक्षकांपासून सावध राहा. त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून अभिवादन घेणे, सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते लोकांनी पाहावे यासाठी ते मोठ्या लांब प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”
लूक 20:46-47 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“शास्त्र्यांसंबंधाने सावध असा; त्यांना लांबलांब झगे घालून मिरवण्यास हवे असते; बाजारांत नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवान्यांत मुख्य मुख्य जागा त्यांना आवडतात; ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात; त्यांना अधिक शिक्षा होईल.”
लूक 20:46-47 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“शास्त्री लोकांविषयी सावध असा, त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायची हौस असते. बाजारात नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवानीत सन्मानाच्या जागा त्यांना आवडतात. ते विधवांची घरे गिळंकृत करतात. लोकांना दाखवण्याच्या उद्देशाने लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना अधिक शिक्षा होईल.”