YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 22:54-62

लूक 22:54-62 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्यांच्यामागे चालला. त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्याभोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला. तेव्हा कोणाएका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.” पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्यास ओळखत नाही.” थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!” नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एकजण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालील प्रांताचा आहे.” परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असतांना त्याच क्षणी कोंबडा आरवला. आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्यास आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.

सामायिक करा
लूक 22 वाचा

लूक 22:54-62 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शेवटी त्यांनी येशूंना अटक करून महायाजक कयफाच्या घरी नेले. पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत होता. आणि जेव्हा काहीजणांनी तिथे अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवली होती आणि एकत्रित खाली बसले होते, पेत्र त्यांच्याबरोबर खाली बसला. एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बसलेले पाहिले आणि ती त्याच्याकडे निरखून पाहून म्हणाली, “हा मनुष्य येशूंच्या बरोबर होता.” पेत्र नकार देत म्हणाला, “बाई, मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” थोड्या वेळाने दुसर्‍या एकाने त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू पण त्यांच्यापैकी एक आहेस.” “महाराज, मी तो नाही,” पेत्र नाकारून म्हणाला. सुमारे तासाभराने आणखी एकाने खात्रीपूर्वक विधान केले व पेत्राला म्हटले, “हा मनुष्य त्यांच्याबरोबर होता. कारण तो गालील प्रांताचा आहे!” हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला. प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.

सामायिक करा
लूक 22 वाचा

लूक 22:54-62 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग त्यांनी त्याला पकडून चालवले व प्रमुख याजकाच्या घरी नेले; तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हाही त्याच्याबरोबर होता.” पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.” काही वेळाने दुसर्‍या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूही त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही.” सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खातरीपूर्वक म्हणू लागला, “खरोखर हाही त्याच्याबरोबर होता; हा गालीलीच आहे.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही.” असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली; आणि ‘आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.

सामायिक करा
लूक 22 वाचा

लूक 22:54-62 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्यांनी येशूला पकडून उच्च याजकांच्या घरी नेले. पेत्र दुरून त्यांच्या मागोमाग चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, पेत्र त्यांच्यामध्ये जाऊन बसला. एका दासीने त्याला विस्तवाजवळ बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हादेखील येशूबरोबर होता.” पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.” काही वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूसुद्धा त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “भल्या माणसा, मी त्यांच्यातला नाही.” सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणू लागला, “खरोखर हादेखील येशूबरोबर होता कारण हासुद्धा गालीलकर आहे!” परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला माहीत नाही.” असे तो बोलत आहे, इतक्यात कोंबडा आरवला. प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली. आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. तो बाहेर जाऊन ओक्साबोक्शी रडला.

सामायिक करा
लूक 22 वाचा