लूक 3:4-6
लूक 3:4-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झालेः “रानात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा. प्रत्येक दरी भरली जाईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल, वांकडी सरळ होतील, आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील आणि सर्व मनुष्यप्राणी देवाचे तारण पाहतील.’”
लूक 3:4-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
संदेष्टा यशया याच्या शब्दांच्या पुस्तकात लिहिले आहे: “अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली, ‘प्रभुसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा. प्रत्येक दर्या भरून जातील, पर्वत आणि डोंगर समान होतील, वाकड्या वाटा सरळ होतील, खडतर रस्ते सुरळीत होतील. आणि सर्व लोक परमेश्वराचे तारण पाहतील.’ ”
लूक 3:4-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले. ते असे - “‘अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा नीट करा; प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील, आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.”’
लूक 3:4-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू आली, प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक दरी भरली जाईल. प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल. वळणावळणाचे रस्ते सरळ केले जातील. खडबडीत वाटा समतल केल्या जातील आणि सर्व लोक देवाने केलेले तारण पाहतील.