लूक 4:18-19
लूक 4:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठवले आहे.”
लूक 4:18-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण त्यांनी मला अभिषेक केला आहे गरीबांना शुभवार्ता जाहीर करावी. कैद्यांच्या सुटकेसाठी घोषणा जाहीर करण्यास; आंधळ्यांना दृष्टी देण्यास, जुलूम करणार्यांपासून सोडविण्यास त्यांनी मला पाठविले आहे, प्रभुच्या कृपादृष्टीचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे.”
लूक 4:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, [भग्नहृदयी जनांस बरे करण्यास] त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.”
लूक 4:18-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये आला आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगण्यासाठी त्याने मला अभिषिक्त केले आहे. धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची मी घोषणा करावी, तसेच जे ठेचले जात आहेत त्यांची सुटका करावी व प्रभूच्या अनुग्रहाचे वर्ष आले आहे हे जगजाहीर करावे म्हणून मला पाठविण्यात आले आहे.