लूक 4:5-8
लूक 4:5-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सैतान त्यास उंच जागेवर घेऊन गेला आणि एका क्षणांत जगातील सर्व राज्ये त्यास दाखविली. सैतान त्यास म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व वैभव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो. म्हणून जर तू मला नमन करशील आणि माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल.” येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”
लूक 4:5-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली. आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो. जर तू माझी उपासना करशील, तर हे सगळे तुझेच होईल.” येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझा परमेश्वर यांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ”
लूक 4:5-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली; आणि त्याला म्हटले, “ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.” येशूने त्याला उत्तर दिले, “‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,] परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.”
लूक 4:5-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यानंतर सैतानाने त्याला उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले, “ह्यांचे वैभव व हा सर्व अधिकार मी तुला देईन कारण हे माझ्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो. म्हणून तू मला नमन करशील, तर हे सर्व तुझे होईल.” येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”