लूक 5:12-13
लूक 5:12-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू एका गावात असता एक कुष्ठरोगाने भरलेला माणूस तेथे आला. त्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा आहे, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.” येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हणाले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” आणि तत्क्षणी त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला.
लूक 5:12-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा येशू एका गावी असता तेथे कुष्ठरोगाने भरलेला एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून विनंती केली, “प्रभो, आपली इच्छा असली, तर मला बरे करायला आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” तत्काळ त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.
लूक 5:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि असे झाले की, येशू कोणाएका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालथा पडला आणि त्यास विनंती केली, “प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्यास स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे शुद्ध हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.
लूक 5:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुढे असे झाले की, तो एका गावात असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता; त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि लगेचच त्याचे कुष्ठ गेले.