मलाखी 4:5-6
मलाखी 4:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल. आणि तो बापाचे हृदय मुलांकडे, आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरवील, नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भूमीला शापाने मारीन.”
सामायिक करा
मलाखी 4 वाचामलाखी 4:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पाहा! याहवेहचा तो महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, मी तुमच्याकडे संदेष्टा एलीयाहला पाठवेन. तो पालकांचे अंतःकरण त्यांच्या मुलांकडे व मुलांचे अंतःकरण त्यांच्या पालकांकडे करेल; अन्यथा मी फटकारून त्यांच्या देशाचा संपूर्ण नाश करेन.”
सामायिक करा
मलाखी 4 वाचामलाखी 4:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडन करीन.”
सामायिक करा
मलाखी 4 वाचा