मत्तय 1:18-19
मत्तय 1:18-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू ख्रिस्त यांचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीया, हिचे लग्न योसेफाबरोबर ठरलेले होते. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले. तिचा पती योसेफ हा नीतिमान होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले.
मत्तय 1:18-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरिया हिचा योसेफबरोबर वाङ्निश्चय झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रु करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुपचूप सोडून देण्याचा त्याने विचार केला.
मत्तय 1:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला.
मत्तय 1:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला.