मत्तय 17:17-18
मत्तय 17:17-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने उत्तर दिले, “अहो विश्वासहीन व चुकलेल्या लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कुठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला येथे माझ्याजवळ आणा.” येशूने भुताला निघून जाण्याचा हुकूम सोडताच ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला.
मत्तय 17:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्यास माझ्याकडे आणा.” येशूने त्या भूताला धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.
मत्तय 17:17-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन व दुष्ट पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी सहन करू? त्या मुलाला माझ्याकडे आणा.” मग येशूंनी त्या मुलामधील दुरात्म्याला धमकावून घालवून दिले व त्या क्षणापासून तो मुलगा बरा झाला.
मत्तय 17:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा येशूने उत्तर दिले, “अरेरे, हे विश्वासहीन व कुटिल पिढी! मी कोठवर तुमच्याबरोबर राहावे? कोठवर तुमचे सोसावे? त्याला येथे माझ्याजवळ आणा.” नंतर येशूने भुताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला.