मत्तय 26:42-44
मत्तय 26:42-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणखी त्याने दुसर्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, हा प्याला मी प्यायल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले; कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसर्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली.
मत्तय 26:42-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तसे होवो.” नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्यास आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली.
मत्तय 26:42-44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू पुन्हा गेले आणि प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, जर हा प्याला मी प्याल्याशिवाय दूर करता येणार नसेल, तर तुमच्या इच्छेप्रमाणे होवो.” नंतर ते परत त्यांच्याकडे आले, त्यावेळीही ते झोपी गेलेले आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. म्हणून ते प्रार्थना करण्यासाठी परत गेले आणि पुन्हा त्यांनी तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली.
मत्तय 26:42-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने दुसऱ्यांदा पुढे जाऊन प्रार्थना केली, “हे माझ्या पित्या, मी प्यायल्याशिवाय हा प्याला दूर केला जाणार नसेल, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” त्याने पुन्हा येऊन पाहिले, तर ते झोपलेले होते. त्यांचे डोळे फार जड झाले होते. त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा तेच शब्द बोलून प्रार्थना केली.