मत्तय 6:16-18
मत्तय 6:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल.
मत्तय 6:16-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखा तुमचा चेहरा खिन्न करू नका, कारण आपण उपवास करत आहोत, असे लोकांना दिसावे म्हणून ते मलूल चेहऱ्याने वावरतात. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू. अशासाठी की, तू उपवास करत आहेस, हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे. म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.
मत्तय 6:16-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांस दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना त्यांचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे. तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा. यासाठी की, तू उपवास करता हे लोकांस दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हास उघडपणे प्रतिफळ देईल.
मत्तय 6:16-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुम्ही उपास करता त्यावेळी, ढोंग्याप्रमाणे उदास चेहरा करू नका. आपण उपास करीत आहो असे लोकांना दाखविण्यासाठी ते उतरलेल्या चेहर्यांनी वावरतात. मी तुम्हाला खरोखरच सांगतो की, त्यांचे संपूर्ण प्रतिफळ त्यांना मिळून चुकले आहे. तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा, म्हणजे तुम्ही उपास करीत आहा असे लोकांना समजणार नाही. पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल आणि मग तुमचा पिता जे तुम्ही गुप्त प्रकारे केलेल्या गोष्टी पाहतात ते तुम्हाला प्रतिफळ देतील.